ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी जर्मनीला करावे लागणार ८३ लाख कोटी रुपयांचे प्रावधान !
ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेले धोके आणि आव्हाने यांना तोंड देण्यासाठी वर्ष २०३० पर्यंत जर्मनी सरकारला १ सहस्र अब्ज डॉलर्सची म्हणजेच जवळपास ८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील जागतिक आस्थापन ‘ब्लूमबर्ग’ने वर्तवला आहे.