पाकिस्तानच आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयदाता ! – भारताचे संयुक्त राष्ट्रांत खडे बोल

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील युक्रेनच्या विषयात पाकने काश्मीर विषय घुसडला !

भारताचे अधिकारी प्रतीक माथुर

न्यूयॉर्क – पाकिस्तान हाच आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयदाता आहे, अशा शब्दांत भारताचे अधिकारी प्रतीक माथुर यांनी पाकला खडेबोल सुनावले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ११ व्या आपत्कालीन बैठकीत युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याविषयीच्या प्रस्तावावर चर्चा चालू असतांना पाकच्या अधिकार्‍याने काश्मीरविरोधी सुर आळवला. त्यास माथूर यांनी रोखठोक प्रत्युत्तर देत पाकची बोलती बंद केली. ते पुढे म्हणाले, ‘‘पाकचे हे कृत्य अनावश्यक चिथवणारे आहे. त्यांनी पहिले स्वतःच्या कृत्यांकडे पहावे.’’

रशिया-युक्रेन वादात भारत पुन्हा तटस्थ !

रशिया आणि युक्रेन यांच्या चालू असलेल्या युद्धाविषयी मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील मतदानात भारताने तटस्थ भूमिका घेतली. या वेळी भारताने ‘एका वर्षानंतर तरी जग रशिया-युक्रेन वाद संपवण्याच्या जवळ तरी पोचले आहे का ?’, असा प्रश्नही उपस्थित केला. या मतदानात १९३ सदस्य देशांपैकी १४१ जणांनी या प्रस्तावाच्या बाजूने, तर ७ जणांनी विरोधात मतदान केले. अन्य देशांनी तटस्थ रहाण्याची भूमिका घेतली.

संपादकीय भूमिका 

वारंवार अशी दिशाहीन सूत्रे मांडून महासभेचा अमूल्य वेळ घेत असल्याविषयी पाकला सभेतून बहिष्कृत करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांवर दबाव आणला पाहिजे !