इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळल्याने ६२ जणांचा मृत्यू

हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

भंडारा येथे नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉटसर्किटमुळे आग, १० नवजात बालकांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.

मुंबई शहरातील शेकडो रुग्णालयांकडे अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र नाही !

अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र न घेणार्‍या रुग्णालयांवर प्रशासन का कारवाई करत नाही ?

गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता येथे उड्डाणपूल करावा !

गंगावेस ते शिवाजी पूल या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते ,त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे.

विसरवाडी (जिल्हा नंदुरबार) येथे ७ गायींना ट्रकची धडक

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ४ जानेवारी या दिवशी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बसलेल्या ७ गायींना ट्रकने जोरदार धडक दिली.

उत्तरप्रदेशात स्मशानभूमी परिसरातील छत कोसळून २१ जणांचा मृत्यू

येथील मुरादनगर स्मशानभूमी परिसरातील एक छत कोसळल्याने २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण दबले गेले. येथे बचावकार्य चालू असून आतापर्यंत ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

कशेडी घाटात खासगी बसला अपघात : एका लहान मुलाचा मृत्यू

शिव (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी ‘चिंतामणी’ नावाची खासगी बस पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खेड जवळील कशेडी घाटात ५० फूट दरीमध्ये कोसळली. या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. यातील बहुतांश प्रवासी संगमेश्‍वर येथील आहेत.

कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यावर गावकर्‍यांनी ७०० कोंबड्या पळवल्या !

पूर्वीच्या काळात लोक धर्माचरणी असल्याने त्यांच्या मनात चोरीचा विचारही येत नव्हता!

रेडी येथील समुद्रात बुडणार्‍या पर्यटकाला जीवरक्षकाने वाचवले

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील समुद्रात बुडणारा देहली येथील पर्यटक परवेझ खान याला येथील ‘जीवरक्षक’ संजय गोसावी यांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले.