इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळल्याने ६२ जणांचा मृत्यू

‘श्रीविजया एअर’ या विमान वाहतूक आस्थापनाचे विमान

जकार्ता (इंडोनेशिया) – येथून पॉण्टिआनलका येथे जाणार्‍या ‘श्रीविजया एअर’ या विमान वाहतूक आस्थापनाच्या देशाच्या अंतर्गत विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच त्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

समुद्रात कोसळलेल्या विमानाचा शोध घेतांना जहाजे