पुण्यातील शिवाजी मार्केटला लागलेल्या आगीत २५ दुकाने जळून खाक !

पुणे येथील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. त्यानंतर १ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

सातारा येथील यवतेश्‍वर-कास रस्त्यावर सापडली मानवी कवटी आणि अस्थी !

निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहिवडी (जिल्हा सातारा) येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात आग 

दहिवडी येथील नगरपंचायत कार्यालयास आग लागली यात लाकडी सामान आणि धारिका, विद्युत् साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !

कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !

ममता बॅनर्जी घायाळ झाल्याने निवडणुकीत दीड मास प्रचार करू शकणार नाहीत !

नंदीग्राम येथे प्रचार करत असतांना एका लहान अपघातात ममता बॅनर्जी यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने पुढील दीड मास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पुणे येथील ५ दुकानांना भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पिंपरी अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पहाटे ५ वाजता शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टळली आहे.

ब्रेक तपासणी करतांना झालेल्या अपघातामध्ये मोटार वाहन निरीक्षक गंभीर घायाळ !

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे दैनंदिन काम चालू असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

मद्यधुंद अ‍ॅपे रिक्शा चालकाच्या धडकेने २ वर्षांची मुलगी ठार !

मद्यपान करणार्‍यास कितीही कठोर शिक्षा दिली, तरी अपघातातील हानी भरून निघणार नाही. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

अपघातग्रस्त डिझेल टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लुटले

यवतमाळ-वणी मार्गावरील शिवारात मध्यरात्री डिझेलच्या टँकरचे टायर फुटले आणि तो उलटला. याची वार्ता शेजारील गावांत पसरल्यावर क्षणार्धात टँकरमधील सहस्रो लिटर डिझेल लोकांनी लुटून नेले.

तंत्रज्ञानाचा आधिक वापर करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणार ! – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.