
सॅन अँटोनिया (अमेरिका) – टेक्सास राज्यातील येथील सॅन अँटोनिओ शहरातील दक्षिणेकडे रेल्वे रुळाच्या बाजूला एका ट्रकमध्ये ४६हून अधिक मृतदेह आढळले आहेत. या मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. या ट्रकचा चालक पसार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला ? हा नैसर्गिक मृत्य आहे कि हत्या ? हे स्पष्ट झाले नसून टेक्सास आणि सॅन अँटानिओ पोलीस अन्वेषण करत आहेत.
‘Stacks of bodies’: 46 dead migrants found in truck in Texas https://t.co/iER599Mp7Y pic.twitter.com/nPfPzANo1V
— Reuters World (@ReutersWorld) June 28, 2022
ट्रकमधील १६ जण घायाळ असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृत हे सर्व अमेरिकेच्या शेजारील मेक्सिको देशातून अमेरिकेत घुसखोरी करून येत होते आणि त्यांचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक