पिंपरी (पुणे) येथे दिंडीत भरधाव कंटेनर शिरल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू !

देहू-आळंदी मार्गावरील चिखलीजवळ देहूहून आळंदीकडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत २० जून या दिवशी भरधाव कंटेनर शिरल्याने भगवान घुगे या वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३ वारकरी घायाळ झाले आहेत.

दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावाच्या सीमेत दिंडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. त्यात मायाप्पा कोंडिबा माने या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून ३० वारकरी गंभीर घायाळ आणि इतर किरकोळ घायाळ झाले आहेत.

बंगालच्या इस्कॉन मंदिरात उष्णतेमुळे तिघांचा मृत्यू

या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.

वांद्रे-वरळी सागरी मार्गावरील अपघातात २ जण ठार !

वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या गंभीर घायाळ व्यक्तीचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. ३० मे या दिवशी झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

बांगलादेशात एक डेपोला आग; ४४ लोकांचा मृत्यू !

यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले

नेपाळच्या तारा एअरलाइनच्या बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त होऊन त्यातील सर्व २२ प्रवासी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाला. या विमानाचे अवशेष नेपाळमधीलच हिमालय पर्वतांमध्ये सापडले आहेत.

विसापूर (जिल्हा सातारा) येथील सुभेदार विजय शिंदे यांना वीरगती

लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले.

रामबन (जम्मू-काश्मीर) येथे निर्माणाधीन बोगदा कोसळला !

ही घटना १९ मेच्या रात्री राष्ट्रीय महामार्गाजवळील रामबन जिल्ह्यातील माकेरकोट भागात खूनी नाल्याजवळ घडली. येथे बोगदा बांधला जात आहे. या अपघातात बोगद्यासमोर उभी असलेली वाहने, बुलडोझर, ट्रक यांसह अनेक यंत्रांचीही हानी झाली आहे.

नवज्योत सिद्धू यांनी केले आत्मसमर्पण !

वर्ष १९८८ मध्ये झालेल्या एका वाहन अपघाताच्या वेळी सिद्धू यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

रायगड येथे बसला झालेल्या अपघातामध्ये १६ जण घायाळ !

श्रीवर्धन येथून मुंबई येथे निघालेल्या बसला १६ मे या दिवशी साखरोने फाटा येथे अपघात झाला. अपघातामध्ये बस उलटून गाडीतील १६ प्रवासी घायाळ झाले. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे झाला आहे