हाथरस (उत्तरप्रदेश) येथे ट्रकने चिरडल्याने ७ कावड यात्रेकरूंचा मृत्यू

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथे महामार्गावर ट्रकने चिरडल्याने ७ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यातील एक यात्रेकरू गंभीररित्या घायाळ झाला आहे.

हे यात्रेकरून हरिद्वार येथून गंगाजल घेऊन ग्वाल्हेर येथे परतत होते. पोलिसांनी सांगितले की, ट्रकचालकाला लवकरच अटक करण्यात येईल.