पक्षी धडकल्याने योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर तातडीने उतरवले

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वाराणसीत आले होते. वाराणसीहून लक्ष्मणपुरीकडे परतत असतांना योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्यामुळे हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आले.

या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून योगी आदित्यनाथ सुरक्षित असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.