परिवहन विभागाच्या कारवाईत १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्समधील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळले !

नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्सला आग लागून ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र १३७ खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांतील अग्नीशमनयंत्रणा बंद असल्याचे आढळून आले.

गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

पूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. ज्यामध्ये श्रीकृष्णाऐवजी नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाऊ लागले !

जालना येथे आयशर-रिक्शाच्या भीषण अपघातात ५ ठार, २ घायाळ !

जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा गावाजवळ १७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परवीन शहा, आलिया शहा मुस्कान शह, कैफ शहा आणि मनीषा तिरुख अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह ७ जणांचा मृत्यू  

केदारनाथपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाला.

दुर्गापूजा पहाण्यास जाणार्‍या भाविकांना बसची धडक लागून तिघांचा मृत्यू

आरोपींचा धर्म पहाता त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला का ? याची चौकशी झाली पाहिजे !

नाशिक येथे धावत्या बसने पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू !

संभाजीनगर रस्त्यावर ८ ऑक्टोबरच्या पहाटे डंपर-खासगी बस (चिंतामणी टॅव्हल्स) यांचा अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे.

जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू !

तवांग येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळल्याने झालेल्या अपघातात लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव या वैमानिकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक वैमानिक घायाळ झाला.

उत्तराखंडमध्ये ५०० मीटर खोल दरीत बस कोसळल्याने २५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.