उत्तराखंडमध्ये ५०० मीटर खोल दरीत बस कोसळल्याने २५ जणांचा मृत्यू

नैनिताल (उत्तराखंड) – येथील पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. ही बस वर्‍हाडींना घेऊन हरिद्वारमधील लालढांग येथून काडागावकडे जात होती.

राज्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले, ‘बसमध्ये सुमारे ५० लोक होते. पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या पथकाने २१ जणांची सुटका केली असून घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.’ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.