अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू !

तवांग (अरुणाचल प्रदेश) – येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळल्याने झालेल्या अपघातात लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव या वैमानिकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक वैमानिक घायाळ झाला. ही घटना ५ ऑक्टोबरला सकाळी घडली. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.