नाशिक येथे धावत्या बसने पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू !

नाशिक येथे अपघात झालेली बस

नाशिक – संभाजीनगर रस्त्यावर ८ ऑक्टोबरच्या पहाटे डंपर-खासगी बस (चिंतामणी टॅव्हल्स) यांचा अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला. गाढ झोपेत असणार्‍या प्रवाशांचा कोळसा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले.