गोव्याच्या समुद्रात नौदलाचे ‘मिग-२९ के’ लढाऊ विमान कोसळले : वैमानिक बचावला !

उडत्या शवपेट्या झालेली भारतीय लढाऊ विमाने !

पणजी (गोवा) – भारतीय नौदलाचे ‘मिग-२९ के’ हे लढाऊ विमान सरावाच्या वेळी झालेल्या अपघातामुळे गोव्याच्या समुद्रात कोसळले; मात्र या वेळी वैमानिक बचावला.

हे विमान नियमित सराव उड्डाण करत होते. तळावर परतत असतांना त्यात तांत्रिक बिघाड झाला. नौदलाने शोध मोहीम राबवून वैमानिकाला शोधून काढले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी चौकशी मंडळ स्थापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.