केदारनाथमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकासह ७ जणांचा मृत्यू  

डेहराडून (उत्तराखंड) – केदारनाथहून गुप्तकाशी येथे परतणारे एक खासगी हेलिकॉप्टर कोसळले. यातील वैमानिकासह ७ जणांचा मृत्यू झाला. केदारनाथपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाला.

हे हेलिकॉप्टर ‘आर्यन हेली’ या खासगी आस्थापनाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे आस्थापन उत्तरकाशी येथील आहे. हे आस्थापन केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांना नेण्याचे काम करते. वाईट हवामानामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.