ठाणे येथे मेट्रो निर्माणाच्‍या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून महिलेचा मृत्‍यू !

ठाणे येथे मेट्रो निर्माणाच्‍या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून महिलेचा मृत्‍यू

ठाणे, ५ जानेवारी (वार्ता.) – ठाणे येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो ४ च्‍या मार्गिकेचे काम चालू आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील कॅडबरी जंक्‍शन भागात ५ जानेवारीला सकाळी मेट्रो निर्माणाच्‍या कामाचा लोखंडी पत्रा अंगावर पडून सुनीता कांबळे (वय ३७ वर्षे) या महिलेचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी पुढील अन्‍वेषण पोलीस करत आहेत.