भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत वाहन अपघातात गंभीररित्या घायाळ

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत (डावीकडे) अपघातग्रस्त वाहन (उजवीकडे)

रुडकी (उत्तराखंड) – भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत यांचा ३० डिसेंबरच्या पहाटे  येथील नारसन सीमेवर हम्मदपूर झाल जवळील वळणावर भीषण अपघात झाला. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ डेहराडून येथे नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पंत वाहनात एकटेच होते. गाडी चालवतांना त्यांना झोप लागल्याने गाडीने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्या वेळी पंत यांनी गाडीतून बाहेर उडी घेतली. त्यानंतर गाडीने पेट घेतला आणि ती पूर्णपळे जळाली.