रिवा (मध्यप्रदेश) येथे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू

दुसरा घायाळ

घटनास्थळ

रीवा (मध्यप्रदेश) – येथील उमरी गावात ५ जानेवारीच्या रात्री ११.३० ते १२ या वेळेत प्रशिक्षणार्थी विमान कोसळून झालेल्या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला, तर दुसर्‍या प्रशिक्षणार्थी वैमानिकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हे विमान मंदिराच्या कळसाला धडकले. धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. उमरी विमानतळावर ‘फाल्कन एव्हिएशन ट्रेनिंग अकादमी’ ही वैमानिकांना प्रशिक्षण देते.