नागपूर येथे मांजाने गळा कापला गेल्याने एकाचा मृत्यू !
नुसते असे आवाहन करण्यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
नुसते असे आवाहन करण्यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
महानगरपालिकेच्या अग्नीशमनदलाच्या ७ बंबांनी पाणी फवारून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
येथील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापनास १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात संपूर्ण आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर १३ जानेवारीच्या पहाटे ५ वाजता पाथरे येथे मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात १० प्रवासी ठार, तर २५-३० प्रवासी घायाळ झाले आहेत.
आतापर्यंत आग विझवण्यासाठी ४ टन ‘फोम’ आणि १२ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. अग्नीशमन दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी दिवसरात्र काम करत होते. त्यांना संरक्षण, नौदल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.
या परिसरात हिमवर्षाव होत असून त्यामुळे रस्त्यावर बर्फ जमा होत आहे. या बर्फावरून जात असतांना गाडीचे चाक घसरल्याने गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली.
या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज ! आग लागल्याने कारखान्यातील सर्व कामगार त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी टळली; मात्र एक कामगार या दुर्घटनेत घायाळ झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिली.
एका तरुणीची अशा प्रकारे अमानुष हत्या करणार्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
‘मी सुखरूप आहे, काळजी करू नका.’ आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप आहोत, असा संदेश त्यांनी व्हिडिओ प्रसारित करून दिला आहे. ‘पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील’, अशीही माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.