गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी

कोल्हापूर – येथील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापनास १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात संपूर्ण आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. प्राथमिक माहितीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग इतकी मोठी होती की, तिच्या धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत होते. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोल्हापूर महापालिका, औद्योगिक वसाहत, तसेच विमानतळ येथील अग्नीशमनदलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.