नागपूर येथे मांजाने गळा कापला गेल्‍याने एकाचा मृत्‍यू !

नागपूर – घरासमोर खेळणार्‍या वेद साहू या मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला आहे. ही घटना १५ जानेवारी या दिवशी घडली असून तो जरीपटका येथील महात्‍मा गांधी हायस्‍कूलमध्‍ये इयत्ता ५ वीत शिकत होता. नायलॉन मांजामुळे अपघात होण्‍याच्‍या घटना सातत्‍याने घडत आहेत. त्‍यामुळे पालकांनी काळजी घेण्‍याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

(नुसते असे आवाहन करण्‍यापेक्षा प्रशासनाने अशा अपघातांना आळा बसावा, यासाठी नायलॉन चिनी मांजाची विक्री करणार्‍यांना शोधून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे ! – संपादक) अन्‍य एका घटनेत १४ जानेवारीच्‍या दुपारी कुंभार टोली परिसरात कापलेला पतंग पकडण्‍याच्‍या नादात रेल्‍वेची धडक बसून कु. वंश धुर्वे या मुलाचा मृत्‍यू झाला.