काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या बदख्शान खान भागात एक प्रवासी विमान कोसळले. अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी हे विमान भारताचे असल्याचे वृत्त प्रसारित केले होते;
The unfortunate plane crash that has just occurred in Afghanistan is neither an Indian Scheduled Aircraft nor a Non Scheduled (NSOP)/Charter aircraft. It is a Moroccan registered small aircraft. More details are awaited.
— MoCA_GoI (@MoCA_GoI) January 21, 2024
मात्र भारत सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले. हे विमान भारताचे नाही, तर मोरक्को येथील असल्याचे भारताने म्हटले आहे. हे विमान २० जानेवारीला ‘रडार’वर दिसणे बंद झाले होते. त्यानंतर ते दुसर्या दिवशी जेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळल्याचे आढळून आले. या विमानाविषयी अधिक माहिती समजू शकलेली नाही.