कोणताही अपघात न होण्यासाठी निर्णय !
नागपूर – मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे; मात्र पतंगासमवेत लागणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिक यांसाठी जीवघेणा ठरतो आहे. पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणार्या नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेता शहरातील अनेक उड्डाणपूल १५ जानेवारी या दिवशी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. उड्डाणपुलावरून वाहन चालवतांना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दिवसभरासाठी शहरातील जवळ-जवळ सर्व उड्डाणपूल बंद करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकानायलॉन मांजावर बंदी असल्याने तो वापरणार्यांवर कारवाई करण्याऐवजी उड्डाणपूल बंद ठेवून अनेकांची गैरसोय करणे कितपत योग्य आहे ? |