धुळे – साक्री तालुक्यात असलेल्या सामोडे परिसरात फरशी पुलावरून जाणार्या उसाच्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पाण्यात कोसळला. वाहकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला; मात्र तरीही तो गंभीररित्या घायाळ झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला बाहेर काढले. येथील पुलाचे काम चालू आहे; मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने येथून सहस्रो वाहने ये-जा करतात. या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी नेहमी घडतात. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सहस्रो लोक आपला जीव मुठीत घेऊन सध्या हा प्रवास करीत आहेत; मात्र प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
संपादकीय भूमिकाएखाद्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असूनही स्थानिक प्रशासन त्यावर उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न का करत नाही ? |