वैनगंगा नदीत ८ महिला बुडाल्या !

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर या गावातील महिला चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथे मिरची तोडण्यासाठी वैनगंगा नदीपात्रातून डोंग्याने निघाल्या होत्या. नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा (लहान होडी) उलटला. त्यात बसलेल्या ८ महिला नदीपात्रात बुडाल्या. ही घटना २३ जानेवारीला सकाळी ८ वाजता घडली. यातील दोघींचे मृतदेह मिळाले आहेत, तर अन्य मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे. एक महिला वाचली आहे.