Haryana School Bus Accident : हरियाणात खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ मुले घायाळ  

ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.

नागपूर येथे भरधाव कंटनेरच्या धडकेत १२ वाहनांची हानी !

७ एप्रिलच्या रात्री शहरातील मानकापूर परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनरने सिग्नलच्या ठिकाणी उभ्या असलेल्या १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली.

चिखली (पिंपरी) परिसरातील १५० हून अधिक भंगाराची दुकाने आगीमध्ये जळाली !

आतातरी महापालिका अवैध भंगार दुकानांवर कारवाई करणार का ?

माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर येथे शिंप्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू !

येथील छावणी परिसरात असणार्‍या शिंप्याच्या दुकानाला ३ एप्रिलला पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

‘सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.

Polluted Smart City Panjim : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार !

सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकी सरकारने नौकेवरील भारतीय कर्मचार्‍यांचे केले कौतुक !

अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्‍यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.

Accidental Fire At Urs : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे उरुस साजरा करतांना बाबा बुडन स्वामी दर्ग्याच्या कुरणाला लागली आग !

जंगलाच्या राखीव भागात स्वयंपाक करू नये, अशी जिल्हा प्रशासनाची सूचना असूनही त्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक बनवण्यात आला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनी केली आहे.

अमरावती येथे बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील चिखलदराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात २ महिला आणि १ बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.