माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात

माणगाव (जिल्हा रायगड) – मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला. ७ एप्रिलला ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेलसमोर आल्यावर हा भीषण अपघात झाला. यात रिक्शाचा पूर्णतः चुराडा झाला आहे.