हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून चौकशीची मागणी
(उरुस म्हणजे एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव)
चिक्कमगळुरू (कर्नाटक) : येथील बाबा बुडन स्वामी दर्ग्याच्या जंगलातील कुरणाला आग लागली. येथे मुसलमानांकडून उरुसाच्या वेळी तंबू उभारून स्वयंपाक केला जात असतांना ही आग लागल्याचे म्हटले जात आहे. यात २ तंबू जळाले.
जंगलाच्या राखीव भागात स्वयंपाक करू नये, अशी जिल्हा प्रशासनाची सूचना असूनही त्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक बनवण्यात आला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. बाबा बुडन स्वामी दर्गा हे दत्तस्थान असून मुसलमानांनी तेथे अतिक्रमण केले आहे. याविषयी अनेक दशकांपासून वाद चालू आहे.