- कोणतीही जीवितहानी नाही
- लाखो रुपयांची हानी !
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरातील भंगार साठवण दुकानला ६ एप्रिलच्या मध्यरात्री भीषण आग लागून त्यामध्ये १५० हून अधिक भंगार दुकाने जळाली आहेत. ही आग ‘शॉर्टसर्किट’मुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जळालेली सर्व भंगार दुकाने अवैध होती, असे महापालिकेचे मनोज लोणकर यांनी सांगितले आहे. (आतातरी महापालिका अवैध भंगार दुकानांवर कारवाई करणार का ? – संपादक) या आगीमध्ये कुणीही घायाळ झाले नाही, तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पी.एम्.आर्.डी.ए. यांच्यासह खासगी आस्थापनांकडून आणि अग्नीशमनदलाच्या जवानांनी १८ घंट्यांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. चिखली परिसरामध्ये भंगार दुकानाची संख्या ही सहस्रोंच्या घरात आहे. या दुकानांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कारवाई करतांना दिसत नाही. (महापालिकेचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात कि त्यांना आर्थिक लाभ होतो ? याची चौकशी व्हायला हवी ! – संपादक)