महेंद्रगड (हरियाणा) – येथे ११ एप्रिलला सकाळी जी.एल्.पी. शाळेची खासगी बस उलटल्याने झालेल्या अपघातात ६ मुलांचा मृत्यू झाला, तर १५ मुले घायाळ झाली. घायाळ मुलांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.