छत्रपती संभाजीनगर येथे शिंप्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – येथील छावणी परिसरात असणार्‍या शिंप्याच्या दुकानाला ३ एप्रिलला पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या अग्नीतांडवात २ पुरुष, ३ महिला आणि २ मुले यांचागुदमरून मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण कुटुंबच उध्वस्थ झाले आहे.

आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणार्‍या दुमजली घरात ही आग लागली. पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणार्‍यांना खाली उतरता न आल्याने गुदमरून ७ जणांचा मृत्यू झाला. अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मृत्यू झालेल्या ७ जणांच्या व्यतिरिक्त एक जण हरवला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.