नामवंत सराफ व्यावसायिक किशोर पंडित यांचे निधन
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले.
राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर या दिवशी वीजपुरवठा तांत्रिक कारणामुळेच खंडित झाला होता, असा अहवाल आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी.जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग चालू झाल्यावर मार्चमध्ये सर्व शाळा बंद करण्यात आल्या. अखेर शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या ११२ शाळा चालू करण्याची महापालिका प्रशासनाची युद्धपातळीवर सिद्धता चालू आहे.
नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थीवर्गासाठी २३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करण्याचा राज्यशासनाचा निर्णय हा आत्मघातकी आहे. त्यामुळे होणार्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता, या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.
झाराप येथील गंगाराम रेडकर यांच्या मालकीची बोलेरो पिकअप वाहन क्र. एम्एच् ७ पी २६११ ही बालाजी मार्बल, कुडाळ येथून अज्ञात चोरट्याने चोरली होती. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
राज्यात रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या विशेष फेरीसेवेच्या शुल्कात ५ पटींनी वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत आणि काही ग्रामस्थ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे.
वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून महावितरण आणि राज्यसरकार यांचा निषेध केला.