फेरीसेवा शुल्कात वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत न्यायालयात

पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या विशेष फेरीसेवेच्या शुल्कात ५ पटींनी वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत आणि काही ग्रामस्थ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीच्या वेळी शासनाने उत्तर देण्यास वेळ वाढवून  मागितल्याने त्यांना खंडपिठाने २ आठवड्यांची समयमर्यादा दिली आहे. रात्रीच्या वेळी विशेष फेरीसेवेसाठी पूर्वी ५५ रुपये शुल्क आकारण्यात येत होते; मात्र आता हे शुल्क २५० रुपये करण्यात आले आहे. ही शुल्कवाढ करून शासनाने चोडण-माडेल ग्रामस्थांवर अन्याय केल्याचा दावा करण्यात आला आहे.