प्रशासनाच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांचे लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. तरी वर्ष २०१२ पासूनचा कर, दंड, व्याज वसूल होण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.