२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करण्याची कोल्हापूर महापालिका प्रशासनाची युद्धपातळीवर सिद्धता

कोल्हापूर, २० नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोना विषाणूचा संसर्ग चालू झाल्यावर मार्चमध्ये सर्व शाळा बंद करण्यात आल्या. अखेर शासनाच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या ११२ शाळा चालू करण्याची महापालिका प्रशासनाची युद्धपातळीवर सिद्धता चालू आहे. सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर जवळपास ६५ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून ३७० शिक्षकांची पडताळणी करण्यात आली आहे.

२२ नोव्हेंबरअखेर सर्वच्या सर्व म्हणजे १ सहस्र १९५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पडताळणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली आहे.