पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा

कचर्‍याचे वजन वाढावे, यासाठी खासगी जागेतील कचरा भरून कराराचा भंग केल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा नोंद

पुण्यातील इलेक्ट्रिक बाजारातील बनावट साहित्यावर पोलिसांकडून कारवाई !

बनावट साहित्य विकून जनतेची फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !

हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?

संभाजीनगर येथे ५०० रुपयांत बनावट मतदान ओळखपत्राचा गोरखधंदा उघडकीस ! 

आतापर्यंत किती बनावट मतदान ओळखपत्र बनवली जाऊन मतदान झाले असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !

शेतकर्‍यांचे अधीक्षक अभियंता कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’

वीजवितरण आस्थापनाने वीज पंपासाठी पुरवलेला वीजपुरवठा थकित वीज देयकापोटी खंडित केल्याच्या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाच्या कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘ठिय्या आंदोलन’ केले.

बोगस प्रमाणपत्र विकणार्‍या धर्मांधास अटक

विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे.

यवतमाळ येथील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल आगीत जळले

धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल ९ फेब्रुवारी या दिवशी आगीत जळून गेले. या आगीत लाखो रुपयांचे सागवान आणि मौल्यवान वृक्ष, तसेच वनस्पती नष्ट झाल्या. जंगलात अनेक अनेक दुर्मिळ पशू-पक्षीही होते.

पुणे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांतील काही जागा वापराविना पडून

महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये काही लाख चौरस फूट जागा वापराविना पडून आहे.

धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘परिवार संवाद’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करतांना छायाचित्र काढण्यासाठी रेटारेटी केल्याने गोंधळ झाला.

संगम माहुली येथे उसाच्या शेताला लागलेल्या आगीत ८ एकरातील ऊस जळला

या आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्‍यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्‍याला आग लावण्यात आली होती.