यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा अयशस्वी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु उपस्थितीअभावी हा मोर्चा रहित करण्यात आला. 

सामाजिक संदेश देत नगरमध्ये आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा !

जागरूक नागरिक मंचच्या वतीने शहीद भगतसिंग उद्यानात देशावर प्रेम व्यक्त करून जातीयवाद नष्ट करण्याचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे पार पडला.

पुणे येथे वृद्धांच्या घरात लाखो रुपयांची चोरी

तळेगाव रेल्वे स्थानक परिसरातील मनोहरनगरमध्ये १३ फेब्रुवारीला पहाटे ४ जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा साडेचार लाखांहून अधिक मूल्याचा ऐवज चोरला.

आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला

विवाहानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद झाल्याने ४ मासांपूर्वी सौ. जानवी या माहेरी आल्या होत्या.

कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पाडली जाणार

कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात आले असतांनाच महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या हद्दीत येणारी (‘राईट ऑफ वे’च्या येणारी) बांधकामे काढण्याविषयी हालचाली गतीमान झाल्या आहेत.

प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद उफाळला

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

ओझर-कांदळगाव-मसुरे रस्त्याच्या कामासाठी कांदळगाववासियांनी दीड घंटा वाहतूक रोखली

रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

दोडामार्ग तालुक्यातील परप्रांतीय भूमीमालक आणि कामगार यांची चौकशी करा !

‘भारतीय जनता युवा मोर्चा’ची दोडामार्ग तहसीलदार आणि पोलीस यांच्याकडे मागणी