वाई (जिल्हा सातारा) येथून २९ किलो गांजा शासनाधीन

वाई (जिल्हा सातारा) येथील नंदनवन वसाहतीमधील एका बंगल्यामध्ये गांजाची शेती केली जात होती. पोलिसांंनी या बंगल्यावर धाड टाकली. त्यांना तिथे २९ किलो गांजा आणि २ जर्मन नागरिक आढळून आले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ८० वर्षांचे जिवाजी साळुंखे यांना १० वर्षे सक्तमजुरी

मुली आणि महिला यांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढणे हे समाज दिवसेंदिवस अधोगतीला जात असल्याचे लक्षण आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे हाच उपाय आहे !

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुंड शरद मोहोळसह ५ जण कह्यात !

आदेशाचे पालन न करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी तरच समाजव्यवस्था सुधारेल !

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा नोंद

कुख्यात गुंड गजानन मारणेने कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढण्याच्या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

खर्रा खाण्याच्या व्यसनावरून पत्नीला घटस्फोट दिला जाऊ शकत नाही ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय

पत्नी खर्रा खाते म्हणून येथील एका शंकर नावाच्या व्यक्तीने न्यायालयात अर्ज केला होता, त्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

सिंधुदुर्गनगरी येथे थकीत वेतनासाठी सुरक्षारक्षक आणि सफाई कामगार यांचे कामबंद आंदोलन

सिंधुदुर्ग येथील ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेले ३५ सुरक्षारक्षक आणि ३३ सफाई कामगार गेले ८ मास वेतनापासून वंचित आहेत .

पुण्यात ५ वर्षांच्या मुलीवर हॉटेलच्या सुरक्षारक्षकाकडून अत्याचार !

समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. समाजाची दु:स्थिती दूर करण्यासाठी धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना ‘मास्क’ न वापरल्याने दंड

‘मास्क नाही, प्रेवेश नाही’ या राज्यशासनाच्या धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे पालघरमध्ये समोर आले असून ‘मास्क’ बांधला नाही म्हणून पालघरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना २०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.