मालपे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ८ वर्षीय मुलगा गंभीर घायाळ

मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण होणार्‍या अशा गंभीर समस्यांवर प्रशासन वेळीच उपाययोजना का काढत नाही ?

दोडामार्ग शहरात पोलिसांनी मारहाण केल्याचा युवकांचा आरोप : पोलीस निरीक्षकांनी आरोप फेटाळला

शहर बाजारपेठेत ३० ऑक्टोबरच्या रात्री शीतपेय आणण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी थोबाडीत मारले आणि नंतर पोलीस ठाण्यात नेऊन अमानुष मारहाण केली.

एकल प्लास्टिकचा वापर करणार्‍या ७ व्यापार्‍यांकडून ४५ सहस्र रुपये दंड वसूल

शहरामध्ये एकल वापर प्लास्टिकचा वापर करतांना आढळणारी आस्थापने, संस्था आणि नागरिक यांवर आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.

पुणे येथे १०० हून अधिक गुन्हे करणार्‍याला अटक !

पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा न झाल्यामुळे पुढील अनेक गुन्हे करण्यास चोराची मजल गेली.

काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले.

पिंपरी (पुणे) येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे खोदकाम करतांना ३ निकामी बाँबशेल सापडले !

३० ऑक्टोबर या दिवशी चिंचवडमधील ‘प्रेमलोक पार्क’ येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला.

दिवंगत आर्.आर्. पाटील यांना झालेल्या मानसिक त्रासाचे योग्य वेळी उत्तर देईन ! – रोहित पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी उमेदवारी आवेदन भरले आहे.

वानाडोंगरी (नागपूर) येथे वेणा नदीकाठी सापडली ८०० आधारकार्ड !

नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.

गोशाळेसाठी २४ घंट्यांत निधी उभारण्याचा गोप्रेमींचा आदर्श

तालुक्यातील वारंगांची तुळसुली येथे २८ ऑक्टोबर या दिवशी गोवत्स द्वादशी अर्थात् वसुबारसनिमित्त श्री. आनंद वारंग यांच्या गोशाळेत सवत्स धेनूचे पूजन करण्यात आले.