कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले. या मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव यासुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या; काँग्रेसने त्यांना विश्वासात न घेता मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली आहे. या वेळी त्यांच्यासमवेत राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांसह अन्य उपस्थित होते.