सांगली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी उमेदवारी आवेदन भरले आहे. त्यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजयकाका पाटील असणार आहेत.
या वेळी रोहित पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर झालेल्या भाषणात आबांना (दिवंगत आर्.आर्. पाटील यांना) काय मानसिक त्रास झाला आहे, हे मला माहीत आहे. याचे योग्य वेळी उत्तर देईन. रोहित पाटील म्हणाले की, २० दिवस मला द्या, मी तुमच्यासाठी आयुष्य समर्पित करतो. मी नुसताच बोलतो, अशी माझ्यावर टीका होते; मात्र १० वर्षे तुम्ही संसदेत बोलला नाहीत, म्हणून मी बोलल्याचे कौतुक होते, असे म्हणत रोहित पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर टीका केली.