नागपूर – येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे. वानाडोंगरी परिसरातील या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील अन्वेषण चालू केला आहे. येथील पोस्ट कार्यालयातून ही आधारकार्ड फेकून देण्यात आल्याचे समजते. ती वितरित न झाल्याने ती येथे टाकण्यात आली. पोलीस तेथील अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करत आहेत.