पुणे – गुन्हे शाखा विभाग ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या पथकाने पापसिंह दुधानी या सराईत गुन्हेगाराला अटक केली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली येथील १२ गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे पोलिसांची गस्त चालू होती. वानवडी परिसरामधून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्यावर १०० हून अधिक घरफोडी आणि इतर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली. (पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा न झाल्यामुळे पुढील अनेक गुन्हे करण्यास चोराची मजल गेली. – संपादक)