दिंडोरी (जिल्हा नाशिक) येथील रामशेज गड १०१ टेंभे, २१ मशाली आणि १००१ दिव्यांनी उजळला !

‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !

निवडणुकीचे काम करणार्‍या १५० कर्मचार्‍यांना नोटिसा !

२० नोव्हेंबर या दिवशी २ सहस्र २५९ कर्मचार्‍यांसाठी घेण्यात आलेल्या १ दिवसीय प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या १५० कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या

चंदन चोरट्यांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करणार ! – पुणे पोलीस

विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांवर चंदन चोरांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये घायाळ झालेल्या चोरट्यांवर वैद्यकीय उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

पुणे शहरातील विनाअनुमती फटाका विक्रेत्यांवर गुन्हे नोंद !

अशा फटाका विक्रेत्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? नागरिकांकडून तक्रारी येण्याची वाट का पहात असतात ?

तिलारी घाटात पकडलेल्या ट्रकमध्ये होते १० टन गोमांस : २ जणांवर गुन्हा नोंद

तिलारी घाटातून गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक ग्रामस्थांनी २८ ऑक्टोबर या दिवशी पकडला होता. या ट्रकमध्ये १५ लाख रुपये किमतीचे १० टन गोमांस, ७ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख रुपये किमतीची चारचाकी (कार), असा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला आहे.

जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोपूजन !

पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे.

आळंदी (पुणे) येथील माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये रंगणार ‘दिवाळी पहाट’ !

माऊलींच्या समाधी मंदिरात दिवाळी पहाट कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या समयमर्यादेत साजरा होत आहे. या निमित्ताने आळंदीकरांना नामवंत गायकांच्या स्वरांची मेजवानी ऐकायला मिळाणार आहे.

वसुबारसेला रायगड उजळला !

‘दुर्गराज रायगड’ या संस्थेच्या वतीने सलग १३ व्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी रायगडावर ‘शिवचैतन्य सोहळा’ साजरा केला गेला.

देवद (पनवेल) येथील गाढी नदीत कचरा टाकू नये यासाठी जाळीचा उपाय !

नदीत कचरा टाकणे, हे नागरिकांच्या संवेदनहीन प्रवृत्तीचेच द्योतक आहे. केवळ स्वतःच्या सोयीसाठी परिसर अस्वच्छ करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा हवी !

कल्याणीनगर प्रकरणातील ७ जणांवर दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर !

विशेष न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना डॉ. श्रीहरि हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची चौकशी करण्यासाठी अनुमती दिली आहे.