कळंबोली येथे रणरागिणी शाखेकडून उपक्रमांचे आयोजन !

हिंदु जनजागृती समिती प्रणीत महिला शाखा रणरागिणीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत येथील राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळ, शिवशाही गणेशोत्सव मित्रमंडळ, जोगचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव गीतांजली मित्र मंडळ, बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी उपक्रम घेण्यात आले.

शासनाने चिनी उत्पादनांवर बहिष्कार आणि स्वदेशीला प्रोत्साहन हे धोरण राबवावे ! – सौ. अनिता बुणगे, रणरागिणी शाखा

सध्या भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव असून चीन सातत्याने भारताला धमकावत आहे. या स्थितीत चीनला व्यापाराची नवी दालने उघडी करून देणे, अत्यंत घातक आहे.

गणेशोत्सव मंडळांमध्ये चिनी वस्तूंची खरेदी करू नका, असे प्रबोधन करणारे फलक लावण्यात यावेत ! – सौ. रोहिणी तडवळकर, माजी नगरसेविका

गणेशोत्सव, दिवाळी या कालावधीत चिनी वस्तूंची खरेदी न करता भारतीय वस्तूंचा आग्रह धरावा. चीनला धडा शिकवण्याची ही संधी आहे. गणेशोत्सव मंडळांनीही चिनी वस्तूंची खरेदी करू नये, असे प्रबोधनपर फलक लावण्यात यावेत.

महाराष्ट्रात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यात आली.

फरीदाबाद (हरियाणा) येथे रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा आणि अन्य जागृत महिला यांनी येथील सेक्टर २८ मधील पोलीस ठाण्यात अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीवर २८ महिलांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्‍चय करून चीनला धडा शिकवूया.


Multi Language |Offline reading | PDF