हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

अमरावती येथील आंदोलनात मागणी

अमरावती, २० नोव्हेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब याला तात्काळ फासावर लटकवावे आणि लव्ह जिहादच्या वाढत्या घटना बघता ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने सौ. अनुभूती टवलारे यांनी येथे घेण्यात आलेल्या आंदोलनात केली. या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी ‘कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथील अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’, अशी मागणी केली.

आंदोलनात उपस्थित धर्मप्रेमी महिला

योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव, हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन व्यास, ह.भ.प. ऋत्विक महाराज सगणे, भारतीय सिंधूसभेचे युवा संघटक श्री. प्रकाश सिरवानी यांनीही श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.

उपस्थित संघटना आणि मान्यवर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख श्री. रमेश छांगानी, भारत रक्षा मंचचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश मिश्रा, छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यश्र श्री. आकाश दाभाडे, ‘सुश आसरा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा निशी चौबे

क्षणचित्रे

१. काही महिला ‘व्हॉट्सॲप’वरील पोस्ट वाचून आंदोलनात सहभागी झाल्या. काही धर्मप्रेमीही स्वतःहून संपर्क करून आंदोलनात सहभागी झाले.

२. आंदोलनाच्या ठिकाणाहून ये-जा करणारे हिंदु उत्साहाने आंदोलनात सहभागी झाले.