दादर (मुंबई) येथील आंदोलनात रणरागिणींची मागणी
हिंदु तरुणीचे ३५ तुकडे करणार्या आफताब पुनावाला या नराधमाला फाशी देण्याची मागणी !

मुंबई – देहलीत आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची हत्या कोणत्या उद्देशाने केली, हे जाणून घेतले पाहिजे. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, त्याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ‘ब्लॅकमेल’ करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रावधी प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. त्यामुळे नराधम लव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी राज्यात स्वतंत्र असा कठोर कायदा करावा, तसेच आफताब या नराधमाला फाशी द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या मुंबई समन्वयक डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी केली. दादर (पूर्व) रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी रणरागिणी शाखेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. (सौ.) पेंडभाजे बोलत होत्या.
आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून ‘अबला नको, तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’, अशा घोषणा दिल्या.

डॉ. (सौ.) पेंडभाजे पुढे म्हणाल्या, ‘‘पालघर येथील हिंदु तरुणी श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या आणि तिने लग्नाविषयी विचारणा केल्यावर तिला मारहाण करत तिची निर्घृणपणे हत्या करणारा लव्ह-जिहादी आफताब हा क्रूर नराधम आहे. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निर्घृण हत्या कुणीच करणार नाही. त्यामुळे या हत्येचे अन्वेषण करतांना हत्येचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. आपल्या पोटच्या पोरीचे ३५ तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का ? या घटना पहाता राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार आहोत.’’
राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा यावर बोलतील का ?
एका महिला पत्रकाराला ‘कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे वात्सल्याने सांगणार्या पू. भिडेगुरुजी यांना नोटीस पाठवणार्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांविषयी काही बोलतील का ? राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे भयावह प्रमाण पहाता यावर त्या काही टिप्पणी करणार कि नाही ? बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र तर नाही ना ? यामागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचेही गृहविभागाने अन्वेषण करावे, अशीही मागणी डॉ. (सौ.) पेंडभाजे यांनी केली.
येत्या अधिवेशनात लव्हा जिहादच्या विरोधात कायदा करावा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’च्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. हिंदूंच्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम घरापर्यंत पोचले आहेत. हिंदु पालक आणि हिंदु युवती कधी जाग्या होणार ? ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा.
‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्याच्या मागणीच्या निवेदनावर नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वाक्षर्या !रेल्वेस्थानकावरील, तसेच आजूबाजूने जाणार्या नागरिकांनी थांबून आंदोलनातील भाषणे लक्षपूर्वक ऐकली. येत्या अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्याच्या मागणीच्या निवेदनावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षर्या केल्या. (यावरून नागरिकांमध्ये लव्ह जिहादविषयी किती चीड आहे, हे लक्षात येईल. याची नोंद घेत सरकारने आता तरी तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, अशी समस्त हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक) |
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता वास्तविक जनतेला अशी मागणी करावी लागू नये. सरकारी पातळीवरून स्वतःहून हा प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा केला गेला पाहिजे ! |
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी