टोणगाव (संभाजीनगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
संभाजीनगर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने टोणगाव (जिल्हा संभाजीनगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या राष्ट्र-जागृती सभेला हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर आणि जालना जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे, तसेच रणरागिणी शाखेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी मार्गदर्शन केले. या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सूत्रसंचालन श्री. अतुल देवकर यांनी केले. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात ही सभा पार पडली.
समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी समस्त ग्रामस्थांना ‘हिंदु समाजाची सद्यःस्थिती, लव्ह जिहादचे वाढते भीषण संकट आणि त्यावरील उपाय’, यांविषयी उपस्थितांना संबोधित केले. रणरागिणी शाखेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी ‘महिलांची सद्यःस्थिती पहाता सर्वांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे’, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. टोणगाव येथील ४०० हून अधिक धर्मप्रेमी आणि माताभगिनी उपस्थित होत्या.
२. हिंदु राष्ट्र-जागृती सभेची मागणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे केली होती. त्यामुळे संपूर्ण आयोजनात ग्रामस्थांनी सिंहाचा वाटा उचलला.
३. सभेला महिला आणि युवती यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
४. संपूर्ण गावात यंदा ‘कुणीही ३१ डिसेंबर साजरे करणार नाही’, असाही सर्वांनी निश्चय केला.