राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. याविषयी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ११ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली.

मशिदींमधील आतंकवादी शोधण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यांनी कधी मोहीम राबवली का ? – राज ठाकरे

देशाचे सर्वाेच्च न्यायालय आणि विविध राज्यांतील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांवर कार्यवाही व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन घोषित केले. आंदोलन करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली.

राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली ! – कालीचरण महाराज

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली आहे. भोंग्यांविषयीची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.

नगर जिल्ह्यात २ सहस्र अनधिकृत भोंगे !

नगर येथील अजान भोंग्याविना ! श्रीरामपूरमधील सय्यदबाबा चौकातील मशिदीसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करणार्‍या मनसे कार्यकर्त्यांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.

मुंबईतील २६ मशिदींत पहाटेची अजान भोंग्याविना होणार !

ज्या मशिदींवर भोंगा लावण्यात येईल, त्या मशिदीच्या जवळील मंदिरांवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा नोंद !

१ मे या दिवशी येथे झालेल्या सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ११६, ११७ आणि १५३ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या खटल्यात त्यांना जामीन मिळू शकतो

‘आवाजी’ अत्याचाराचे पाठीराखे !

सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !

मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करण्यासारखी परिस्थिती नाही ! – खासदार संजय राऊत

सर्वांनी अनुमती घेतली असल्याने कारवाईची आवश्यकता नाही. हाच नियम मंदिर, चर्च आदी सर्वांना लागू आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.

राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भाषणाचा जुना व्हिडिओ प्रसारित !

या व्हिडीओद्वारे राज ठाकरे यांनी शिवसेनेला भोंग्यांविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे भूमिका घेण्याचे आवाहन केले !

९० ते ९२ टक्के ठिकाणी मुंबईत सकाळची अजान झाली नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबईतील ही घटना म्हणजे हिंदूंचे एकप्रकारे यशच म्हणावे लागेल. हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, हे मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सर्वांनाच उघड झाले. हा संघटितपणा हिंदूंनी तसाच ठेवून हिंदु धर्मावरील सर्वच आघात परतवून लावायला हवेत !