राज ठाकरे भोंग्यांविषयीची पुढील भूमिका आज मांडणार

आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याविषयी पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या, ३ मे या दिवशी ‘ट्वीट’ करून सांगीन, असे ‘ट्वीट’ राज ठाकरे यांनी २ मे या दिवशी केले.

राज ठाकरे यांच्या सभेविषयी सर्व गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे या दिवशी येथे जाहीर सभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडली. या सभेसाठी येथील पोलिसांनी १६ अटीं घालून दिल्या होत्या.

राज ठाकरे यांच्या सभेची गर्दी पाहून गुदमरून मराल ! – अविनाश जाधव, नेते, मनसे

भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘राज ठाकरे यांना संविधान भेट देण्यात येईल’, असे सांगून पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींचे उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्यात येईल, अशी चेतावणी दिली होती.

भोंग्यांविषयीची पुढील भूमिका राज ठाकरे आज मांडणार

मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

‘डेसिबल’चा नियम एकाच धर्माला सांगू शकत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एका मुसलमान पत्रकाराने त्याच्या लहान मुलाला भोंग्याचा त्रास होत असल्याचे मौलवीला सांगितले. मुसलमान समाजालाही भोंग्याचा त्रास होतो.

पुण्यात अक्षय्य तृतीयेला होणार्‍या मनसेच्या महाआरतीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरांत ३ मे या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्यासह संलग्न असलेल्या ७ ते ८ संघटना कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात घातपाताचा कट ?

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी एका वाहनात पोलिसांना एकूण ९० तलवारी सापडल्या. ही शस्त्रास्त्रे राजस्थान येथून जालन्याकडे नेण्यात येणार होती.

भोंग्यांमागील ढोंगी !

इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यावयाचे असते; मात्र ‘अजान देणाऱ्या व्यक्तीचा आवाज भोंग्यांतून बाहेर पडणे’, हे खरे तर इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे काही इस्लामिक राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही.

शरद पवार यांच्या संदर्भात नियतीचा काव्यागत न्याय !

रमझान काळात ‘इफ्तार पार्टी’चे त्यांचे छायाचित्र वार्षिक रतिबाप्रमाणे झळकते. अशा पुरोगामी पवार यांची आणि त्यांच्या सहकार्यांची ते कसे आस्तिक आहोत, हे दर्शवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.